नक्की कोण आहे सचिन वाझेचा खासम खास माणूस विनायक शिंदे? हिरेनला फोन नक्की केला कोणी?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोघांना अटक केली आहे. बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलिस कर्मचारी विनायक शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. Who is Vianayak Shinde? Arrested by ATS

यातील विनायक शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहे. त्याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली. प्रदीप सूर्यवंशी, विनायक शिंदे हे सचिन वाझे यांचे एकदम खास आहेत. सचिन वाझे, विनायक शिंदे यांनी अंधेरी युनिटमध्ये एकत्र काम केले होते. तावडे नावाने हिरेन यांना फोन करणारा विनायक शिंदे असल्याचे बोलले जाते. वाझे यांच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केल्याचा एटीएसला संशय आहे.मे 2020 मध्ये विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये विनायक शिंदे मुंबई पोलिस आयुक्तालयात आला होता. सचिन वाझे यांची त्याने भेट घेतली होती. विनायक शिंदेने सचिन वाझेंच्या केबिनबाहेरील पोलिसांकडून पोलिस लोगोचे मास्क आणि पोलिस लिहिलेली निळी पट्टी मागितल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

अटक केलेल्या दोघांनाही 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी चार जणांचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे. स्फोटकांनी गाडी ठेवण्याचा कट हा जानेवारी महिन्यात मुंबई पोलिस आयुक्तालयातच शिजला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Who is Vianayak Shinde? Arrested by ATS

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती