परमवीर सिंग यांच्या पत्राचे टायमिंग काय सांगते… त्यांच्या पत्राचे बोलविते धनी नेमके कोण…?? अनिल देशमुखांनी कोणाचे टार्गेट अपूर्ण ठेवले…?? ते कोणाला नको आहेत??

विनायक ढेरे

नाशिक – मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल आठ पानी पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणात जी खळबळ उडवली आहे त्याच्या काहीच अँगलचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांमध्ये येताना दिसते आहे. यात पत्रातील मजकूराच्या आधारे हे रिपोर्टिंग होते आहे. यात अर्थातच गृहमंत्री अनिल देशमुख हे टार्गेटवर आहेत…Who is behind paramabir singh letter?, who wants to scutle or nail anil deshmukh?

 • पण यातून काही प्रश्न निर्माण होताहेत… ते परमवीर सिंग यांच्या पत्राच्या टायमिंगवरून… आणि त्यांच्या बोलवित्या धन्यावरून… अनिल देशमुखांनी लोकमतच्या कार्यक्रमात मुलाखत देऊन परमवीर सिंगांच्या बदलीबद्दल काही खुलासे केले होते. त्यातून परमवीर सिंग यांच्या चूका त्यांनी दाखवून दिल्या. त्याचा प्रतिवाद परमवीर सिंग यांनी पत्रातून केल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे… पण कोणीच त्याच्या खऱ्या टायमिंगवर किंवा पत्रातील मजकूराच्या between the lines वर भाष्य केलेले दिसत नाही.
 • परमवीर सिंग यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री या नात्याने आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री या नात्याने रिपोर्टिंग आणि ब्रीफिंग करणे हा कर्तव्याचा भाग आहे. पण ज्येष्ठ नेते शरद पवारांना त्यांनी कोणत्या नात्याने अथवा कपॅसिटीत ब्रीफिंग केले… किंबहुना पवारांनी ते स्वतःच्या कोणत्या कपॅसिटीत घेतले…?? ते राज्यसभेचे खासदार आहेत. खासदाराला असे आयपीएस अधिकाऱ्याकडून ब्रीफिंग अथवा रिपोर्टिंग घेण्याचा अधिकार पोहोचतो का…??
 • शरद पवारांनी ब्रीफिंग – रिपोर्टिंग घेऊन नेमकी कोणती कारवाई केली…??
 • हे सवाल शरद पवार हे कितीही ज्येष्ठ नेते असले तरी कायदेशीर दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि कळीचे आहेत. या प्रश्नांची खरी उत्तरे मिळाली किंवा मिळविली तर या सगळ्या प्रकरणाची राजकीय मेख सापडून येईल.
 • गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे अनिल देशमुखांवर नाराज असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत आहेत… पवारांची नेमकी अनिल देशमुखांवर नाराजी का…?? याचा १०० कोटींच्या टार्गेटशी काही संबंध आहे का…?? याची चौकशी आणि तपास कोणती एजन्सी करणार आहे..??
 • परमवीर सिंग यांनी लिहिलेले पत्र देशमुखांच्या मुलाखतीनंतर बाहेर आले आहे. या टायमिंगचा अर्थ वरवर दिसतो तेवढाच आहे की… आणखी काही त्यात दडले आहे…??
 • परमवीर सिंग यांची फक्त बदली झाली आहे. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तरीही देशाच्या इतिहासातली पहिली रिस्क ते घेतात… थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचा, तोही १०० कोटींचा आरोप ते लेखी करतात…याचा नेमका अर्थ काय…??
 • परमवीर सिंग हे अतिवरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. या सगळ्या प्रकरणातले गांभीर्य, धागेदोरे त्यांना नक्कीच माहिती आहेत… तरीही त्यांनी लेखी नावे घेण्याची रिस्क घेतली आहे… ही रिस्क त्यांनी स्वतःच्या हिमतीवर – बळावर घेतली आहे… की अन्य कोणाच्या बळावर…?? किंवा अन्य कोणाच्या सांगण्यावरून किंवा अन्य कोणाच्या इशाऱ्यावरून घेतली आहे… की जे राज्याच्या गृहमंत्र्यांपेक्षा वरिष्ठ अथॉरिटी आहेत…
 • की ज्या कोणाला अनिल देशमुख गृहमंत्रीपदी नको आहेत… त्यांच्या इशाऱ्यावरून परमवीर सिंग यांनी हे पत्र आजच लिहिले आहे अथवा उघड केले आहे…?? या प्रश्नांच्या खोलात गेले तर कदाचित त्याची उत्तरे मिळतील…पण ती उघड होतील का….??

Who is behind paramabir singh letter?, who wants to scutle or nail anil deshmukh?

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*