रोहित पवारांचे मुंबईत ब्रॅंडींग कोणाच्या कल्पनेतून, अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न!


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जामखेड-कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे मुंबईत पध्दतशीरपणे ब्रॅंडींग सुरू आहे. याबाबत त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे? कोणाच्या कल्पनेतून हे होत आहे. यामागे अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  Who can imagine Rohit Pawar’s branding in Mumbai ajit pawar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जामखेड-कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे मुंबईत पध्दतशीरपणे ब्रॅँडींग सुरू आहे. याबाबत त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे? कोणाच्या कल्पनेतून हे होत आहे. यामागे अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबईमध्ये लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता, माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री अनिल परब यांना केली, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


आत्या सुप्रियांपाठोपाठ भाचा रोहित यांच्याही मोदींच्या पुणे दौऱ्यावर राजकीय दुगाण्या


यापूर्वीही त्यांनी लॉकडाऊनमध्ये बंद झालेली एसटी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटी पुन्हा एकदा धावू लागेल आणि ‘गाव तिथे एसटी’ हे चित्र पुन्हा दिसेल, अशी आशा होती. मात्र, एसटी सुरू करण्याचा निर्णय अजूनही सरकारने घेतलेला नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात गावाकडे आलेले व आता कामाच्या आशेने शहरांकडे डोळे लावून बसलेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

गेल्याच महिन्यात पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलने प्रवास केला होता. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील अनेक आमदार असतानाही मुंबईतील लोकल सेवेची मागणी कर्जत-जामखेड मतदारसंघाचा आमदार करतो. त्यासाठी परिवहन मंत्र्यांची भेट घेतो. त्यामागे रोहित पवार यांचे मुंबईत आणि पर्यायाने संपूर्ण राज्यात ब्रॅंडींग करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत पुतणे असलेले रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा विजय झाला होता. शरद पवार यांच्या सातत्याने सोबत असणाऱ्या रोहित यांचे राज्य पातळीवरील नेते म्हणून ब्रॅंडींग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Who can imagine Rohit Pawar’s branding in Mumbai ajit pawar

पार्थ पवार यांनीही सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावर शरद पवार यांनी पार्थच्या मागणीला आपण कवडीचीही किंमत देत नाही, असे वक्तव्य केले होते. परंतु, रोहित पवार यांच्या राजकारणाबाबत शरद पवार यांना कौतुक आहे. त्यामुळे राज्य पातळीवर रोहित पवार यांना प्रस्थापित करून अजित पवार यांनाच शह देण्याचा प्रयत्न नाही ना? अशी चर्चा सध्या सुरू आहे .

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती