शरजीलला मुंबई बाहेर जाण्यास मदत करणारे ठाकरे – पवार सरकारमधील दोन मंत्री कोण??, मुंबईचे की बाहेरचे??

प्रतिनिधी

मुंबई – पुण्यात येऊन एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या शरजली उस्मानीला पाठिशी घालणारे… त्याला मुंबई बाहेर जायला मदत करणारे ठाकरे – पवार सरकारमधील दोन मंत्री कोण आहेत… याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. who are two ministers in thackeray – pawar govt, supported sharjeel usmani?

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी नेता असणाऱ्या शरजीलने पुण्याती एल्गार परिषदेत येऊन हिंदूना सडक्या मेंदूचे असल्याची अश्लाघ्य टीका केली होती. एल्गार परिषदेचे आयोजक न्या. बी. जी. कोळसे पाटील य़ांनी सुरूवातीला त्याच्या वक्तव्याला विरोध केला होता. पण नंतर त्याचे समर्थन केले होते.या वर विधीमंडळात भाजपच्या नेत्यांनी ठाकरे – पवार सरकारला घेरले होते. त्यावर शरजीलला पाताळातून शोधून काढू असे राणा भीमदेवी विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचा समाचार आज आमदार आशिश शेलारांनी घेतला. पण त्याच वेळी दोन मंत्र्यांनी शरजीलला मुंबई बाहेर जाण्यास मदत केल्याचा आरोपही केला.

शेलार यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे – पवार सरकारमधले हे मंत्री कोण… याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदू विरोधी वक्तव्ये कोण देते… कोण आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी हिंदू विरोधी भूमिका घेते… याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

हे मंत्री मुंबईतले आणि परिसरतले आहेत… की बाहेरचे… कोणते मंत्री हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात… महाविकास आघाडीतील ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत… कोणाच्या मतदार संघांमध्ये हिंदूंची संख्या तुलनेने कमी आहे… कोणते मंत्री हिंदू विरोधी एकगठ्ठा मतांवर निवडून येतात… इफ्तार पार्ट्या, हज हाऊससाठी कोणते मंत्री आग्रह धरतात… कोणाच्या मतदार संघात राम मंदिराच्या देणगीला विरोध झाला… कोणी राम मंदिराच्या देणगीवरून आक्षेपार्ह भाषण केले… वगैरे चर्चा सोशल मीडियातून सुरू झाल्या आहेत. अनेकांनी मंत्र्यांच्या नावांचे अपभ्रंश करून ते सोशल मीडियावर टाकले आहेत.

who are two ministers in thackeray – pawar govt, supported sharjeel usmani?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*