Paramavir letterbomb; विधिमंडळाच्या दारात उभ्या राहुन स्वागत करणाऱ्या नेत्या आणि मोदींना फेसबुकी उपदेश करणारे नेते राष्ट्रवादीवरील संकटकाळात आहेत कुठे…??

विनायक ढेरे

मुंबई – मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग – अनिल देशमुख… महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारपुढे एका पाठोपाठ एक संकटांचे डोंगर उभे राहत असताना शिवसेना – राष्ट्रवादीचे नेते बैठकांमध्ये गुंतलेले दिसत आहेत…कोणी प्रतिक्रिया देताहेत… ट्विट करीत आहेत… पण या सगळ्यात दोन उत्साही आणि उपदेशी नेते कुठे दिसत नाहीत… where is supriya sule and rohit pawar? why didn`t they react to anil deshmukh episode yet?

महाराष्ट्रात महायुतीचे बहुमत डावलून, शिवसेनेला भाजपपासून फोडून ठाकरे – पवार सरकार बनवल्यानंतर उत्साहात असणाऱ्या नेत्या… महाराष्ट्राच्या विधिमंडळाशी काहीही संबंध नसताना विधिमंडळाच्या दारात उभे राहुन प्रत्येकाला मिठी मारून स्वागत करणाऱ्या नेत्या आता कुठे आहेत…?? त्या कुठे गेल्या आहेत का…?? त्यांची प्रतिक्रिया का नाही येत, आजच्या ठाकरे – पवार सरकारवरील संकटकाळात…?? की त्यांचा उत्साह फक्त दारात उभे राहून स्वागत करण्यापर्यंतच होता… नंतरची जबाबदारी घेण्यासाठी नव्हता…परमवीर सिंगांचा लेटरबाँम्ब फुटून १८ तास उलटून गेलेत… तरीही या अतिमहत्त्वाच्या नेत्यांची प्रतिक्रिया कशी नाही आली अजून…?? दिल्लीत राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी बैठक बोलावली आहे. तिच्या बातमीत त्यांचे नाव का नाही…?? की नाव नसतानाही त्या सामील होणार आहेत बैठकीत…??

जे या अतिमहत्त्वाच्या स्वागतकर्मी नेत्यांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उपदेशाच्या फेसबुक पोस्ट लिहिणारे तरूण नेते. त्यांचीही ठाकरे – पवार सरकारवरील संकटकाळात कोणतीही प्रतिक्रिया आलेली दिसली नाही. एरवी स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ सोडून देशाच्या प्रश्नांवर हे नेते मोदी – सीतारामन यांना उपदेशाच्या फेसबुक पोस्ट लिहित असतात… पण मग आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यावर १०० कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप होतो, तेव्हा त्यांच्या फेसबुकी लेखणीतली शाई अटून जाते की… त्या लेखणीचे नीब तुटून जाते… की राजकीय उपदेशी बुध्दी चालेनाशी होते… काही समजत नाही…

पण ठाकरे – पवार सरकारवर एवढे मोठे संकट घोंगावत असताना उत्साही स्वागतकर्मी नेत्यांची आणि फेसबुकी उपदेशी नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही, एवढे मात्र नक्की…!!

where is supriya sule and rohit pawar? why didn`t they react to anil deshmukh episode yet?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*