ममता प्रचारात बेताल सुटल्या; “भाजपवाले मते मागायला आले तर हातात लाटणी, झारे घेऊन त्यांना पळवून लावा,” म्हणाल्या!!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक एकीकडे हिंसक बनवलेली असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडाला देखील आता धरबंध राहिलेला नाही. त्या निवडणूक प्रचारसभेत काहीही बोलू लागल्या आहेत.When you cook you use utensils and when these looters come, just chase them with those. Tell them “we don’t want riots”: West Bengal CM Mamata Banerjee, in Amlasuli

अमलासुलीच्या सभेत बोलताना त्या म्हणाल्या, की हे भाजपवाले तुमच्याकडे मते मागायला आले, तर पुढचा मागचा काहीही विचार न करता, तुमच्याकडे असतील – नसतील, ती स्वयंपाकांची भांडी म्हणजे लाटणी, वेळणी, झारे, उलथणे घेऊन त्यांच्या मागे हात धुवून लागा. त्यांच्या अंगावर जाऊन तुमच्या गावातून त्यांना पळवून लावा. आपल्याला बंगालमध्ये ते दंगेखोर नको आहेत.त्याच सभेत त्या म्हणाल्या, की मी वाघीण आहे. मी कोणासमोर झुकणारी नाही. झुकलेच तर मी फक्त बंगाली जनतेसमोर झुकेन. हे भाजपवाले मला येथे येऊन झुकवू पाहाताहेत पण मी त्यांच्यापुढे झुकणार नाही. माझा स्वाभिमान पाहून आता ते मला मारायचा कट रचताहेत.

सीपीआयचे लोक गदाई, काँग्रेसचे लोक जगाई आणि भाजपचे लोक मधाई आहेत, अशी टीकाही ममतांनी आपल्या भाषणात केली. गदाई म्हणजे हिंसक. तर जगाई – मधाई हो दोन ब्राह्मण बंधू होते. पण ते वाईट संगतीने बिघडले.

शेवटी चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा उध्दार केला अशी बंगाली कथा आहे. जगाई – मधाई बंधूंचा उल्लेख बंगालमध्ये वाईट संगतीने बिघडलेल्यांसाठी करतात. त्यांची उपमा ममतांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना दिली.

When you cook you use utensils and when these looters come, just chase them with those. Tell them “we don’t want riots”: West Bengal CM Mamata Banerjee, in Amlasuli

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती