जेंव्हा एक कर्णधार दुसऱ्या कर्णधाराची मदत करतो ; रूटने केले भारतीय कर्णधाराचे कौतुक ; खिलाडू विराट


जेंव्हा एक कर्णधार दुसऱ्या कर्णधाराची मदत करतो ..असेच चीत्र काल चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बघायला मिळाले . चेन्नईमधील उष्ण वातावरणामुळे इंग्लडचा खेळाडू रूटच्या उजव्या पायात क्रॅम्प आला. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर पायात क्रॅम्प आल्याने रूट खेळपट्टीवर कोसळला. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहलीने लगेच रूटला मदत केली . 


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कालपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतकी खेळी केली. पहिल्या दिवसअखेर तो १२८ धावांवर नाबाद होता. यासाठी विराटने तत्पर केलेली रूटची मदत नक्कीच कामी आली . when a captain helps another captain; Virat Kohli to the rescue as Joe Root goes down with cramp

त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर विराटची स्तुती केली. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर रूटनेही विराटाचे कौतुक केले.

‘माझ्या पायात थोडा क्रॅम्प आला. मात्र, विराटने लगेच माझ्याजवळ येऊन माझी मदत केली. त्याने खूपच चांगली खिलाडूवृत्ती दाखवली. आपण त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो,’ असे रूट पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराटच्या खिलाडूवृत्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ अशी धावसंख्या होती. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या.

when a captain helps another captain; Virat Kohli to the rescue as Joe Root goes down with cramp

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था