थांबा…थांबा… WhatsApp मुळे तुमच्या खासगी व्यवहाराला धोका नाही; कंपनीला करावा लागला खुलासा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केल्याचा फटका बसल्यानंतर WhatsApp ला जाग आली असून WhatsApp मुळे तुमच्या खासगी व्यवहाराला धोका नाही, असा खुलासा कंपनीला करावा लागला आहे. WhatsApp wants to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption.

युजर्ससाठी नव वर्षाच्या सुरवातीला नवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने २०२१ च्या सुरुवातीला नव्या अटी आणि शर्ती आणल्याचा त्याला तोटाच झाला. यूजर्स कमी झाल्याचे दिसताच कंपनीला खुलासा करणे भाग पडले आहे.


सिग्नल अँपच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ; WhatsApp ने अटी – शर्ती लादल्यावर यूजर्स नाराज


युजर्सच्या कोणत्याही खासगी बाबींमध्ये WhatsApp पडणार नाही. तुमचे शेअर लोकेशन पाहात नाही. मेसेजिंग, कॉलिंग स्वतःहून सेव्ह करत नाही. करणार नाही. नवीन पॉलिसी प्रायव्हेट यूजर्ससाठी नसून बिझिनेस युजर्ससाठी असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.

WhatsApp wants to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption.

सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर आणि सिग्नलसारख्या अँपला वाढता प्रतिसाद मिळतो हे पाहिल्यानंतर कंपनीला खुलासा करावा लागला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती