व्हॉटसअ‍ॅप पडले पाऊण तासासाठी बंद

व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक शुक्रवारी रात्री भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यात बºयाच युजर्सना अडचणी येत होत्या. काही यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती. WhatsApp fell off for an hour


विशेष प्रतिनिधी

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक शुक्रवारी रात्री भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यात बऱ्या च युजर्सना अडचणी येत होत्या. काही यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती.

शुक्रवारी रात्री १०.४० वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. १ तासापेक्षा अधिक काळ व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मेसेज पाठवण्यास किंवा मिळण्यास अडचण येत होती. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार ४९ मिनीटेच हा प्रकार सुरू होता.दरम्यान, कंपनीने या प्रकाराबाबत नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅपशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यात सुद्धा अनेकांना अडचण येत होती. मात्र एका तासानंतर या सर्व सेवा पूर्वरत झाल्या आहेत.

इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरण्यात येत असलेले व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर जगभरात डाउन झाले होते. व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकही अनेक ठिकाणी डाउन आहे. तिन्ही सेवा या फेसबुकच्याच आहेत. झुकरबर्ग हा त्यांचा मालक आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम एकाचवेळी डाउन झाल्याने ट्वीटरवर मार्क झुकरबर्ग ट्रेंडवर होते. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन हेही ट्वीटर ट्रेंड आहेत.

WhatsApp fell off for an hour

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*