अनिल देशमुखांचे १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट होते… पण ते टार्गेट त्यांना कोणी दिले होते…?? देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा पाढा ठाकरे – पवारांपुढे वाचूनही त्यांनी काय केले??

विनायक ढेरे 

नाशिक – मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्रात लेटर बाँम्ब फोडल्यानंतर महाविकास आघाडीतल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे राजकीय वस्त्रहरण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांच्या बातम्या मराठी माध्यमे आरोप – प्रत्यारोप या स्वरूपात चालवत असली, तरी प्रत्यक्षात परमवीर सिंग यांच्या पत्रामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या सगळ्यांचेच राजकीय वस्त्रहरण झाले आहे. what uddhav thackeray, sharad pawar done in case of home minister anil deshmukh?

कारण आठ पानी पत्रात पहिल्याच पानावर परमवीर सिंगांनी हे स्पष्टपणे नमूद केले आहे, की गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सगळ्या कृष्णकृत्यांची (misdeeds) माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना दिली होती. परमवीर यांनी पत्रात लिहिलेला हा मुद्दा सत्य असेल, तर पुढील प्रश्न पडतात…

  • ही माहिती जर या तीनही अतिवरिष्ठ नेत्यांना दिली होती, तर या नेत्यांनी त्यावर कोणती कारवाई केली??
  • गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीत ठरलेल्या ग-फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे खाते त्या पक्षाने संभाळायचे आहे. अशा स्थितीत गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीवर अर्थात पक्षप्रमुख म्हणून शरद पवारांवर येते. मग परमवीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या कृष्णकृत्यांची माहिती दस्तुरखुद्द पवारांना देऊनही त्यांनी अनिल देशमुखांवर कोणती कारवाई केली…??
  • परमवीर सिंग यांच्या पत्रातील म्हणण्यानुसार अनिल देशमुखांना १०० कोटी रूपये गोळा करायचे होते… हे फक्त त्यांच्यासाठी होते की… त्यांनाही कोणीतरी वरिष्ठाने टार्गेट दिले होते…?? याची चौकशी आणि तपास कोण करणार…??
  • परमवीर सिंग यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री या नात्याने आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री या नात्याने रिपोर्टिंग आणि ब्रीफिंग करणे हा कर्तव्याचा भाग आहे. पण ज्येष्ठ नेते शरद पवारांना त्यांनी कोणत्या नात्याने अथवा कपॅसिटीत ब्रीफिंग केले… किंबहुना पवारांनी ते स्वतःच्या कोणत्या कपॅसिटीत घेतले…?? ते राज्यसभेचे खासदार आहेत. खासदाराला असे आयपीएस अधिकाऱ्याकडून ब्रीफिंग अथवा रिपोर्टिंग घेण्याचा अधिकार पोहोचतो का…??
  • हे सवाल शरद पवार हे कितीही ज्येष्ठ नेते असले तरी कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचे आणि कळीचे आहेत.
  • गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे अनिल देशमुखांवर नाराज असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत आहेत… पवारांची नेमकी अनिल देशमुखांवर नाराजी का…?? याचा १०० कोटींच्या टार्गेटशी काही संबंध आहे का…?? याची चौकशी आणि तपास कोणती एजन्सी करणार…??

what uddhav thackeray, sharad pawar done in case of home minister anil deshmukh?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*