ही कसली जम्बो कार्यकारीणी? काँग्रेसला घरचा आहेर

  • बापाच्या जिवावर खासदार होणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; काँग्रेसमध्येच जुंपली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तमिळनाडूमध्ये आगामी काही दिवसात विधानसभा निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. काँग्रेसने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तमिळनाडूसाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावर पक्षाचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. What kind of jumbo executive is this? karti chidambaram

कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करीत पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधलेला आहे . त्यांनी या ट्विटमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही टॅग केले .असे आहे ट्विट,
प्रकारच्या जम्बो कार्यकारिणीतून काहीच साध्य होणार नाही. यातील कोणालाही अधिकार नसतील आणि पर्यायाने त्यांच्याकडे कोणतेही उत्तरदायित्व असणार नाही.

What kind of jumbo executive is this? karti chidambaram

याला प्रत्युत्तर म्हणून तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या के.महेंद्रन यांनी म्हटले आहे की, वडिलांच्या प्रभावामुळे खासदार झालेल्या व्यक्तीला इतरांचे खडतर परिश्रम कळणे शक्य नाही. राज्य पातळीवर नियुक्ती होण्यासाठी कष्ट करावे लागतात. युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि अनुसूचित जमाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य कार्यकारिणीवर झालेली आहे. केवळ वडिलांमुळे खासदार झालेल्यांना हे कळणार नाही. ऐन निवडणूकीच्या आधी तामिळनाडू काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलेली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*