महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द करण्यात काय अडचण आहे? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल


कृषी हा विषय राज्याचाही आहे. महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून केला जातो. नंतर केंद्राला अधिकार येत नाही. महाविकास आघाडी सरकारला हा कायदा रद्द करण्याची काय अडचण येते हे कळत नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : कृषी हा विषय राज्याचाही आहे. महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून केला जातो. नंतर केंद्राला अधिकार येत नाही. महाविकास आघाडी सरकारला हा कायदा रद्द करण्याची काय अडचण येते हे कळत नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. What is the problem in repealing the Contract Farming Act in Maharashtra? Question by Prakash Ambedkar

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुण्यात गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंबेडकर बोलत होते.ते म्हणाले की, मला काही लोकांनी दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं, पण माझा लढा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून केला जातो. नंतर केंद्राला अधिकार येत नाही.

बाजार समिती ही यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती. कसेल त्याची जमीन याचा कायदा केला होता. मात्र उत्पादनाची लूट होतेय याबाबत काही केले नाही, असे आंबेडकर म्हणाले. त्यांनी सांगितले की, आम्ही दोन मागण्या केल्या होत्या, त्याबाबत लक्ष दिलं नाही. कायद्यात दुरुस्ती करण्याचा विषय सोडा, आता बाजार समितीच रद्द करण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

बिघडलेल्या मानसिकतेला, आजच्या वातावरणाला बदलण्याची गरज आहे. वसंतदादांच्यानंतर एकही राजकारणी सोशल काँन्शिअस झाला नाही. राजकारण्यांचा एक धंदा झालाय. बाकीचे राजकारणी बांधीलकी ठेवत नाही, अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.

What is the problem in repealing the Contract Farming Act in Maharashtra? Question by Prakash Ambedkar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती