खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली, मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.What action was taken in the case of ransom, if the Chief Minister is not speaking, then the Governor should speak to him, Devendra Fadnavis demands


विशेष प्रतिनिधी

मुंबई: खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फोन टॅपिंग आणि आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदभार्तील रॅकेटच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र गृहसचिवांकडे सादर केलेला फोन टॅपिंग व बदल्यांचा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका होता, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, जर तो लवंगी फटाका होता तर एवढे घाबरले का?

फडणवीस म्हणाले, काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला होता? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोणाला वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला होता.

गेल्या काही दिवसात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतात. त्या चिंताजनक आहेत. इतक्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन हे घातक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली. पण त्यात त्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. राज्यातील काँग्रेस ही अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळं बोलतात, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला आहे.

What action was taken in the case of ransom, if the Chief Minister is not speaking, then the Governor should speak to him, Devendra Fadnavis demands

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*