युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार ; जमैकाच्या भारतीय उच्चायुक्तालयाने शेअर केला व्हिडिओ

  • वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे भारतावर विशेष प्रेम आहे. त्याने अनेकदा विविध ठिकाणी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून ते जाहीर देखील केले आहे. गेल भारतीय चाहत्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे.
  • जमैकाच्या भारतीय उच्चायुक्तालयाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे गेल सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत ख्रिस गेल एका खास कारणासाठी भारताचे आभार मानताना दिसतो आहे.
  • भारत सरकारने वेस्ट इंडिजमधील देशांना करोनाची लस दिली
  • गेलने खास व्हिडिओ शेअर केला

विशेष प्रतिनिधी

अँटिंगा : जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मात्र कोरोनावर लसीमुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारताने अनेक देशांना लसीचा पुरवठा केला आहे. दरम्यान वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (West Indies cricketer Chris Gayle) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानले आहेत. कोरोना व्हॅक्सिन वेस्टइंडिजला पाठवल्याने गेलने मोदींचे आभार मानले आहेत. गेलने एका व्हिडीओद्वारे आनंद व्यक्त केला आहे. जमैकातील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. West Indies cricketer Chris Gayle thanked Prime Minister Narendra Modi for the corona vaccine

“तुम्ही आम्हाला कोरोना व्हॅक्सिन दिलीत. त्यासाठी मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचा आभारी आहे. आम्ही यासाठी तुमचे कौतुक करतो. मी लवकरच भारतात येणार आहे. पुन्हा एकदा मी तुम्ही केलेल्या सहयोगाबद्दल आभारी आहे” अशा शब्दात गेलने कौतुक केलं आहे. एकूण 17 सेंकदाचा हा व्हिडीओ आहे. ख्रिसने गुरुवारी 18 मार्चला जमैकातील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त आर. मसाकुई यांची भेट घेतली होती. यादरम्यान हा व्हिडीओ शूट करण्यात आला.

भारत सरकारकडून 8 मार्चला जमॅकामध्ये एस्ट्राजेनेकाचे एकूण 50 हजार कोरोना डोस पाठवण्यात आले होते. त्यानंतर जॅमेकाने भारताचे आभार मानले होते. जमॅकाचे पंतप्रधान अँड्रयू होल्नेस यांनी ट्विटद्वारे आभार मानले होते. “मला सांगताना आनंद होत आहे की, भारताने पहिल्या टप्प्यात 50 हजार कोरोना डोस पाठवले आहेत. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. ”



व्हीव्हीयन रिचर्डसन यांनीही मानले आभार
दरम्यान काही दिवसांपूर्वी वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू व्हीव्हीयन रिचर्डसन आणि आंद्रे रसेलनेही मोदींचे कोरोना लस पाठवल्याने आभार व्यक्त केलं होत. यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील. आपल्या सहकार्यासाठी आम्ही दूतावासाचे आणि सर्व भारतीयांचे आभारी आहोत, असं म्हणत रिचर्डसन यांनी आभार व्यक्त केलं होतं.

गेल आयपीएलसाठी भारतात येणार
ख्रिस गेल भारतात येणार आहे. गेल आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी भारतात येणार आहे. गेल पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या मोसमात गेलला पहिल्या टप्प्यानंतर खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्याला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गेलकडून या मोसमात तुफानी फटकेबाजी अपेक्षित असणार आहे.

West Indies cricketer Chris Gayle thanked Prime Minister Narendra Modi for the corona vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*