निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांचा राजीनामा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाढदिवशी त्यांच्या पक्षातील आणखी एक नेते व मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखपद आणि मंत्रिपदाचा राजीनाम दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाढदिवशी त्यांच्या पक्षातील आणखी एक नेते व मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखपद आणि मंत्रिपदाचा राजीनाम दिला आहे. ममता यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि राज्य सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तथापि, ते टीएमसीचे प्राथमिक सदस्य राहतील आणि त्याच पक्षाचे आमदार म्हणूनही कार्यरत राहतील. West Bengal Minister-of-State, Department of Youth Services and Sports Laxmi Ratan Shukla resigns from his post

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यासाठी पत्र पाठविले आहे. लक्ष्मी रतन शुक्ला हे पूर्वी एक क्रिकेटपटू होते. ते हावडा येथे टीएमसीचे जिल्हाध्यक्षही होते. आता त्यांनी हे पद सोडले आहे.

अनेकांनी दिली टीएमसीला सोडचिठ्ठी

ममता सरकारमधील अनेक मंत्र्यांनी यापूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील प्रभावी मंत्री सुवेन्दु अधिकारी यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर सुवेन्दु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मे 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा काळात हे राजीनामा सत्र घडत आहे. यामुळे ममतांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

West Bengal Minister-of-State, Department of Youth Services and Sports Laxmi Ratan Shukla resigns from his post

दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनी आमदार लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या राजीनाम्याकडे नकारात्मकतेने पाहण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, कोणीही राजीनामा देऊ शकतो. लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पत्रात लिहिले आहे की, त्याना स्पोर्ट‌ससाठी जास्त वेळ द्यायचा आहे, ते आमदारपदी कायम असतील. याकडे नकात्मकतेने पाहण्याची गरज नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*