बंगालच्या निवडणूकीचे आठ टप्पे; अधीररंजन – पृथ्वीराजबाबांचे “सैरभैर फटके”

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूकीचा एकच टप्पा वाढवून निवडणूक आयोगाने त्याचे आठ टप्पे काय केले, तर देशातील विरोधकांचे सैरभर फटके पडायला लागलेत. ममतांनी एकीकडे निवडणूक आयोगावर फायरिंग करून घेतले. त्याचाच आनंद व्यक्त करून काँग्रेसचे बंगालमधील नेते आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्याचे स्वागत करून टाकले. west bengal elections congress leaders adhir ranjan chaudhary and prithviraj chavan makes opposite statements

पण यातला विरोधाभास असा की काँग्रेस नेते त्यामुळे पुरते भंजाळलेले स्पष्ट झाले. कारण एकीकडे अधीररंजन चौधरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याच्या निर्णयाला विरोध केला.अधीररंजन चौधरी यांनी ट्विट करून म्हटले, की बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याचे मी स्वागत करतो. राज्यात राजकीय हिंसाचार वाढला असताना बंदोबस्तासाठी जादा कुमक हवी आहेच. त्यांच्या वाहतूकीसाठी देखील वेळ मिळाला पाहिजे. यासाठी अधिक टप्प्यांमध्ये निवडणूक घेणे योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या ट्विटमधून वेगळाच सूर लावला. तामिळनाडू, केरळसह अन्य राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान असताना फक्त बंगालमध्येच आठ टप्प्यांमध्ये मतदान ठेवल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांच्यासारखाच निशाणा साधला.

पण त्यामुळेच दोन काँग्रेस नेत्यांच्या ट्विट्समधला विरोधाभास उघड झाला. बंगालमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी एकत्र येऊन ममतांविरोधात लढताहेत. आणि पृथ्वीराज चव्हाण ममतांच्याच भूमिकेला साथ देताहेत, असे चित्र निर्माण झाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून हा विरोधाभास समोर आणला.

west bengal elections congress leaders adhir ranjan chaudhary and prithviraj chavan makes opposite statements

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*