ममता दिदींना 11वा झटका ; तृणमूलचे दीपक हालदार भाजपमध्ये ; पश्चिम बंगालमध्ये रणधुमाळी

  • 46 दिवसांत भाजपात जाणारे तृणमुल काँग्रेसचे 11 वे आमदार
  • बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी च्या टिममध्ये विकेट वर विकेट पडतात आहेत. तृणमूल नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. आता तृणमूलमधून सोमवारी राजीनामा देणारे आमदार दीपक हलदार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शुभेंद्रू अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत दीपक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दीपक हलदार हे पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बरचे आमदार आहेत.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता: विधानसभा निवडणुकीपूर्वीच ममता सरकारमधील आणखी एक आमदाराने भाजपात प्रवेश केला. डायमंड हार्बरचे आमदार दीपक हालदार यांनी सोमवारीच TMC चा राजीनामा दिला होता.West Bengal Election 2021: Another TMC MLA joins BJP

भाजप नेता मुकुल रॉय आणि शुभेंदु अधिकारी यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. मागील 46 दिवसांत तृणमूच्या 11 नेत्यांनी भाजपचा हात धरला आहे.राज्यातील ममता बॅनर्जी सरकारचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्येच 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
बंगाल मधील हि राजकीय उलथापालथ ममता बॅनर्जी यांना चांगलीच महागात पडणार आहे.

West Bengal Election 2021: Another TMC MLA joins BJP

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*