West Bengal Assembly Elections 2021 : शिशूपाली अहंकार तोडायची तयारी!!

विनायक ढेरे

पश्चिम बंगालमध्ये २०१६ च्या निवडणूकीनंतर हुगळी, गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. तिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गडाला अक्षरशः सुरूंग लागताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कॅम्पेन हे हिमनगाचे टोक आहे. West Bengal Assembly Elections 2021 Schedule in Marathi

राज्यात भाजपने २०१८ नंतरच राजकीय क्लस्टर बाँम्बिंग सुरू केले होते, त्याची फळे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत दिसली. २०१६ च्या विधानसभेत फक्त ३ आमदार निवडून आणू शकलेला भाजप लोकसभेत १८ खासदार घेऊन पोहोचला. लोकसभा – विधानसभा मतदारसंघांचे प्रपोर्शन लक्षात घेतले, तर भाजपने तीनच वर्षांमध्ये १०८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती.

ही राजकीय हनुमान उडी होती. २०२१ ची विधानसभा निवडणूक त्याचेच एक्स्टेशन ठरवण्याची तयारी भाजपने चालविली आहे. अमित शहांनी १०८ च्या दुप्पट म्हणजे २०० जागांचे टार्गेट भाजपच्या नेत्यांपुढे ठेवले आहे. त्यामागे गेल्या ५ वर्षांमधला राजकीय हवाबदलाच्या क्षमतेचा कॉन्फिडन्स आहे.

भाजप साम – दाम – दंड भेद या रणनीतीनुसार पूर्व आणि दक्षिणेत उरतोय. २०२१ ची विधानसभा निवडणूक ही भाजप देशव्यापी आणि सर्वगामी पक्ष बनण्यातला माइलस्टोन ठरणार आहे. पश्चिम बंगाल त्यातले सगळ्यात मोठे राज्य आहे. ममतांचा अहंकार शिशूपालानजीक पोहोचला आहे. त्याची राजकीय परिणिती येणे बाकी आहे. भाजपने त्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.

West Bengal Assembly Elections 2021 Schedule in Marathi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*