पथदिव्यासाठी चक्क पेटविल्या मशाली ; स्मार्ट सिटी बाणेरमध्ये अनेक वर्षांपासून अंधार

वृत्तसंस्था

पुणे : पुणे तेथे काय उणे, असे कौतुकाने सांगितले जाते. पण, पुण्यात कधी कधी हा उणेपणा प्रकर्षाने जाणवतो. अनेक वर्षांपासून पदपथावरील खांबावर लाईट नसल्यामुळे नागरिकांनी मशाली पेटवून उणेपणा दाखवून दिल्याची घटना बाणेरमध्ये घडली.Well-lit torches for streetlights Darkness for many years in Smart City Baner

बाणेर-सूस-म्हाळुंगे शिव रोडवर पदपथावरच्या खांबावर अनेक वर्षांपासून लाईट बसविलेले नाहीत. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. पण, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चक्क खांबावर मशाली पेटवून निषेध केला. त्यापूर्वी मशाल मोर्चा काढला होता.विशेष म्हणजे हा परिसर स्मार्ट सिटीचा भाग आहे. त्यामुळे नागरी सुविधा पुरविण्याचे काम पालिकेचे असते. या भागाला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाल्याने तातडीने पथदिवे लावावेत, अशी मागणी नागरिकांची आहे.

Well-lit torches for streetlights Darkness for many years in Smart City Baner

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*