ग्रामपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीला जागा दाखवून देऊ, आशिष शेलार यांचा इशारा

तीन दुर्बळ विरुद्ध एक स्वबळ असा संघर्ष असून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.  We will show the place to Mahavikas Aghadi in Gram Panchayat elections, warns Ashish Shelar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तीन दुर्बळ विरुद्ध एक स्वबळ असा संघर्ष असून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. शेलार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षाने फोकस केले आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपाने जोरदार आघाडी उघडण्याचे ठरवले असून, येत्या काळात पक्षातील 12 वरिष्ठ नेते हे राज्य पिंजून काढणार आहेत. महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ.

We will show the place to Mahavikas Aghadi in Gram Panchayat elections, warns Ashish Shelar

शेलार म्हणाले की, सरकारमध्ये असलेले पक्ष एकटेपणाने आमचा सामना करु शकत नाहीत. तीन दुर्बळ विरुद्ध एक स्वबळ असा हा संघर्ष आहे. तोडफोडीवरुन इतरांवर टीका करायची आणि प्रत्यक्षात आपण तेच करायचं, हेच महाविकास आघाडीतील पक्ष करत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. शिवसेनेचा मतदार टक्का घसरतो आहे, त्यामुळे कृत्रिम वलय निर्माण करण्यात येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*