#we want arnab back हँशटँगच्या जोरकस ट्रेंडिंगनंतर #i am indian I don’t support arnab ‘ट्विटरवर ट्रेंड


विशेष प्रतिनिधी

मुंबई : #we want arnab back या हँशटँगनंतर #i am indian I don’t support arnab हँशटँग ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. सुमारे दोन तासांपूर्वीपासून ट्विटरवर #we want arnab back हँशटँग ट्रेंडवर जोरात चालत असताना अर्णब विरोधकांनी नंतर #i am indian I don’t support arnab हँशटँग ‘ट्विटरवर ट्रेंड चालवला आहे.

अर्णबचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने फेटाळाल्यानंतर #we want arnab back हा ट्रेंड चालू झाला. त्याला सुरवातीपासूनच भरघोस प्रतिसाद मिळाला. तो हँशटँग लाख, दीड लाखांच्या प्रतिसादावर पोहोचला. त्याचे जोरकस ट्रेडिंग लक्षात आल्यानंतर अर्णब विरोधकांनी नंतर #i am indian I don’t support arnab हा हँशटँग ‘ट्विटरवर ट्रेंड चालू केला. मात्र सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तो १९ हजार जणांनी रिट्विट केला.

तत्पूर्वी मुंबई हायकोर्टाने अर्णबचा जामीनअर्ज फेटाळून लावत त्याला कनिष्ठ न्यायालयात अर्ज सांगितले. अर्णबची अटक बेकायदेशीर नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदविले. त्यावर #justice demolished हाही टँशटँग ट्विटवर काही काळ ट्रेंड झाला. पण नंतर तो फारसा चालला नाही. मात्र, #we want arnab back नंतर #i am indian I don’t support arnab हे टँशटँग‘ट्विटरवर ट्रेंड होण्यातून महाराष्ट्रातील नेटकऱ्यांची मानसिकता स्पष्ट झाली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती