स्वदेशी लसीवर शंका उपस्थित करणाऱ्यांना भारत बायोटेकचे परखड प्रत्युत्तर; भारतीय कंपन्यांनाच टार्गेट केले जाते; पण भारत, इंग्लडसह १२ देशांमध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या केल्यात चाचण्या

वृत्तसंस्था

हैदराबाद : भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कंपनीने लसीबाबत तसेच औषध निर्मिती आणि लस निर्मितीतील अनुभवाबाबतची माहिती कंपनीने आज शेअर केली आहे.  We are the only company that has got such extensive experience & extensive publication in review journals: Bharat Biotech MD Krishna Ella

कोव्हॅक्सिन लसीच्या सुरक्षेबरोबरच तिच्या चाचण्या आणि त्यांचे परिणाम यांची माहिती भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन शेअर केली आहे. ते म्हणाले, की भारत बायोटेकने लसीची चाचणी भारताबरोबरच इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा १२ देशांमध्ये केली आहे.भारत बायोटेक ही कंपनी भारतापुरतीच मर्यादित नाही, तर जगातील १२३ देशांशी तिचा संबंध आहे. जगभरातील एवढ्या देशांशी विविध प्रकारचा संपर्क आणि संबंध असलेली भारत बायोटेक ही एकमेव कंपनी आहे. लस आणि औषध निर्मिती क्षेत्रात कंपनीला व्यापक अनुभव आणि कौशल्य तर आहेच पण जगभरातील संशोधन विषयक प्रतिष्ठित माध्यमांमध्ये देखील कंपनीच्या शोधकार्याची दखल घेतली आहे.

आमचा किंवा आमच्या कंपनीचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही. पण लसीवरून राजकारण सुरू झाले आहे म्हणून हा खुलासा करावा लागत आहे, असे सांगून कृष्णा इल्ला म्हणाले, की भारत बायोटेककडे बीएसएल – ३ उत्पादन क्षमता आणि सुविधा आहे, जी आज अमेरिकन कंपन्यांकडेही नाही. भारत बायोटेकच्या संशोधकांची ७० हून अधिक आर्टिकल्स जगभरातील प्रतिष्ठित वैद्यकीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

कौशल्य आणि गुणवत्ता यांच्याबाबत भारतीय कंपन्या अद्ययावत असताना अनेकवेळा हेतूतः भारतीय कंपन्यांच्याच क्षमतेवर शंका व्यक्त केल्या जातात. या परीक्षेला भारतीय कंपन्यांना विषम परिस्थितीत समोरे जावे लागते, अशी परखड टिपण्णी कृष्णा इल्ला यांनी केली.

We are the only company that has got such extensive experience & extensive publication in review journals: Bharat Biotech MD Krishna Ella

इबोलासारख्या घातक रोगावरच्या लसीची चाचणी मोजक्या म्हणजे अवघ्या ८७ लोकांवर घेण्यात आली होती. अनेक ठिकाणी त्याची मानवी चाचणी देखील घेण्यात आली नव्हती. तरीही हू संघटनेने इबोला प्रतिंबंधक लसीला तातडीच्या मान्यता दिली. पापुआ न्यु गिनीमध्ये लसीकरण देखील झाले, याची आठवण क़ृष्णा इल्ला यांनी करवून दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*