WB Assembly Elections : शरद पवारांनी ममतांच्या प्रचाराला जाऊ नये, काँग्रेस नेत्याने पत्र लिहून केली मागणी; मतदार ‘कन्फ्यूज’ होण्याची व्यक्त केली भीती

WB Assembly Elections Congress Leader Urges Sharad Pawar To Not Go For Mamata Banerjee campaign, says Voters will Be confused

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्येच रंगणार आहे. तथापि, येथे काँग्रेसनेही डाव्यांसोबत मिळून उमेदवार उभे केले आहेत. येथे काँग्रेसला आता देशातील आपल्या सहकारी पक्षांचीच भीती वाटू लागली आहे. कॉंग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजदचे तेजस्वी यादव यांना पत्र लिहून तृणमूलच्या बाजूने प्रचार करण्यासाठी बंगालमध्ये येऊ नये, अशी मागणी केली आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असा त्यांचा तर्क आहे, जो काही प्रमाणात खराही आहे. WB Assembly Elections Congress Leader Urges Sharad Pawar To Not Go For Mamata Banerjee campaign, says Voters will Be confused


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्येच रंगणार आहे. तथापि, येथे काँग्रेसनेही डाव्यांसोबत मिळून उमेदवार उभे केले आहेत. येथे काँग्रेसला आता देशातील आपल्या सहकारी पक्षांचीच भीती वाटू लागली आहे. कॉंग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजदचे तेजस्वी यादव यांना पत्र लिहून तृणमूलच्या बाजूने प्रचार करण्यासाठी बंगालमध्ये येऊ नये, अशी मागणी केली आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असा त्यांचा तर्क आहे, जो काही प्रमाणात खराही आहे. राष्ट्रवादी आणि राजद हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसचे दोन वेगळ्या राज्यांतील सहयोगी आहेत, परंतु पश्चिम बंगालमध्ये त्यांचा काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींना पाठिंबा आहे.

कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार आणि तेजस्वी यादव यांना पत्र लिहून म्हटले आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थनार्थ प्रचारात येऊ नये, कारण यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. प्रदीप भट्टाचार्य यांनी दोन्ही नेत्यांना पत्र पाठवले आहे, कारण शरद पवार आणि तेजस्वी यादव या दोघांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी बंगालमध्ये निवडणूक बैठका घेण्याची घोषणा केली आहे.शरद पवार आणि तेजस्वी ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगाल निवडणुकीत बैठका घेत असतील तर तेही ममता बॅनर्जी यांच्या विजयासाठी मतांची मागणी करतील आणि तसे करून ते भाजपविरुद्ध प्रचार करतील, परंतु याचा फटका कॉंग्रेस-डाव्या आघाडीला होणार आहे. ही कॉंग्रेस पक्ष आणि नेते प्रदीप भट्टाचार्य यांच्यासाठीही चिंतेची बाब ठरत आहे.

राष्ट्रवादी आणि आरजेडी हे असे राजकीय पक्ष आहेत ज्यांनी कॉंग्रेससोबत वेगवेगळ्या राज्यांत निवडणुका लढवल्या आणि सरकार चालवली. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची शिवसेना आणि कॉंग्रेससोबत महाआघाडी आहे आणि ते सत्तेत आहेत, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आरजेडीसोबत निवडणूक लढविली. यामुळे आपले सहकारीच आपल्या विरोधात बंगालमध्ये प्रचारात उतरण्याची भीती काँग्रेसला सतावू लागली आहे. शरद पवार आता काँग्रेसची विनंती मान्य करतात की ममतांसाठी प्रचार करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांनी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे ते बंगालमध्ये ममतांच्या मदतीला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.

WB Assembly Elections Congress Leader Urges Sharad Pawar To Not Go For Mamata Banerjee campaign, says Voters will Be confused

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था