WB Assembly Elections : भाजपने जाहीर केली 148 उमेदवारांची यादी, मुकुल रॉय नॉर्थ कृष्णनगरातून लढणार


पश्चिम बंगाल राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 148 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने पत्रकार परिषदेत सांगितले की असीम सरकार, मुकुल राय आणि राहुल सिन्हा हेदेखील निवडणूक लढवतील. पश्चिम बंगालमध्ये आता केवळ 11 जागांवरील नावे अंतिम होणे बाकी आहे. WB Assembly Elections: BJP announces list of 148 candidates, Mukul Roy will contest from North Krishnanagar


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 148 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने पत्रकार परिषदेत सांगितले की असीम सरकार, मुकुल राय आणि राहुल सिन्हा हेदेखील निवडणूक लढवतील. पश्चिम बंगालमध्ये आता केवळ 11 जागांवरील नावे अंतिम होणे बाकी आहे.भाजपच्या पत्रकार परिषदेनुसार, मुकुल रॉय उत्तर कृष्णानगरातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री कौसानी मुखर्जी असतील. विधानसभा निवडणुकीत भाजपने खासदार जगन्नाथ सरकार यांनाही उतरवले आहे. राहुल सिन्हा हावडा येथून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता रुद्रनील घोष यांना बबनीपूरमधून तिकीट दिले आहे. तर जितेंद्र तिवारी यांना पांदेश्वर (पांदेश्वर) विधानसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. अग्निमित्रा पॉल यांना आसनसोल दक्षिणचे तिकीट मिळाले आहे. भाजपने फुटबॉलपटू कल्याण चौबे यांनाही तिकीट दिले आहे. याखेरीज भाजपने कला व संस्कृती क्षेत्राशी संबंधित अनेक उमेदवारांना तिकिटे दिली आहेत.

या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बंगालमधील चार खासदारांना यापूर्वीच उभे केले आहे. आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करतानाच भाजपने या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयाकडे नेऊ शकणाऱ्या चार खासदारांची नावेही जाहीर केली आहेत.

WB Assembly Elections: BJP announces list of 148 candidates, Mukul Roy will contest from North Krishnanagar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था