राष्ट्रपती बायडेन पदग्रहण सोहळ्यानिमित्त 20 रोजी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा, तात्पुरत्या आणीबाणीची ट्रम्प यांची घोषणा


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नूतन राष्ट्रपती म्हणून ज्यो बायडेन 20 जानेवारी रोजी पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानी वॉशिंग्टनमध्ये खबरदारी म्हणून तात्पुरती आणीबाणी जाहीर केली.Washington on the 20th for President Biden’s inauguration

20 जानेवारी रोजी बायडेन यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी हिंसाचार उफाळून येईल ,अशी चिंता स्थानिक आणि फेडरल अधिका-यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेमुळे होमलँड सिक्युरिटी विभाग आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीला स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची परवानगी देण्यात आली आहे.


बायडेन आणि रॉबर्ट गेट्स यांचा विरोध डावलून ओसामाचा खातमा केला, ओबामांचा धक्कादायक खुलासा


डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक जमावाने कॅपिटल हिल परिसरमध्ये पाच दिवसांपूर्वी अभूतपूर्व गोंधळ घातला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. कॉंग्रेसने ट्रम्प यांच्या पराभवाची पुष्टी करण्यासाठी औपचारिकपणे इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी सुरू केली.

तेव्हा जमावाने संसदेत शिरून गोंधळ घातला होता.हिंसाचारात 5 जणांचा बळी गेला होता.

Washington on the 20th for President Biden’s inauguration

हिंसाचाराला चिथावणी दिल्यामुळे ट्रम्प यांचे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट बंद केले होते. हिंसाचाराला चिथावणी देणे आणि निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा तो मान्य केला नाही म्हणून ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती