पाकिस्तानातून आलेल्या गीतावरील जिंतूरच्या वाघमारे कुटुंबाचा दावा डीएनए टेस्टद्वारे समजणार


विशेष प्रतिनिधी 

परभणी : पाकिस्तानातून आलेली गीता ही मुलगी आमचीच असल्याचा दावा जिंतुरच्या वाघमारे कुटुंबाने केला आहे. परंतु डीएनए टेस्ट नंतरच हा दावा खरा की खोटा हे समजणार आहे. Waghmare claims geeta returned from Pakistan, is their daughter

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्या कारकिर्दीत 2015 मध्ये गीताला पाकिस्तानातून आणले होते. ती मूकबधिर आहे. परंतु तिचे पालक कोण आहेत, याचा शोध लागला नव्हता. ती इंदूरच्या आनंद आणि मोनिका पुरोहित यांच्याकडे राहते. सांकेतिक भाषा तज्ञ ज्ञानेद्र यांच्याशी गीताही संवाद साधला तेव्हा गीताचे गाव मराठवाडा- तेलंगण सीमेवर असल्याचे संकेत मिळाले. त्यानुसार शोध सुरु झाला.


प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवून दहशतवाद मोडूनच काढला पाहिजे, तिथे जर – तरची भाषा उपयोगाची नाही; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची स्पष्टोक्ती


भारतातून चुकून रेल्वेने पाकिस्तानला पोचलेल्या गीताने पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत ती जिंतुरला आली होती. ती नुकतीच मीना वाघमारे पांढरे यांना भेटली. तेव्हा वाघमारे कुटुंबाने गीता आमची मुलगी असल्याचा दावा केला. गीताच्या अंगावर जळाल्याची खूण आहे, असे मीना सांगतात.

Waghmare claims geeta returned from Pakistan, is their daughter

विशेष म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तशी खूण गीताच्या अंगावर आहे. परंतु गीताने त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता डीएनए चाचणी करून ती त्यांची मुलगी आहे की नाही, हे समजणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती