West Bengal Tamil nadu Assam Kerala Puducherry Assembly Elections 2021 poll schedule in Marathi : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत विधानसभा निवडणूक जाहीर, मतदान २७ मार्च ते २९ एप्रिल मतदान, २ मे रोजी मतमोजणी – निकाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत विधानसभेच्या निवडणूका दरम्यान होणार असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. मतदानाची वेळ एक तासाने वाढवून देण्यात आली आहे. बिहारमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. “एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली W Bengal Tamil nadu Assam Kerala Puducherry Assembly Elections 2021 poll schedule in Marathi

मतदानाच्या तारखा

  • आसाम – तीन टप्पे – ४७ मतदारसंघ २७ मार्च, ३९ मतदारसंघ – १ एप्रिल ४० – ६ एप्रिल
  • पश्चिम बंगाल – ८ टप्पे – पुरूलिया, झालग्राम, पूर्व – पश्चिम मिदनापूर ३० – २७ मार्च, ३० मतदारसंघ बांकूरा, पूर्व – पश्चिम मिदनापूर, दक्षिण परगणा – १ एप्रिल,

३१ मतदारसंघ – ६ एप्रिल, ४४ मतदारसंघ हावडा, हुगळी, दक्षिण परगणा, अलीपूर, कुछबिहार – १० एप्रिल, ४५ मतदारसंघ उत्तर परगणा, नादिया, वर्धमान, दिनाजपूर, दार्जिंलिंग, कलिंपॉग, जलपैगुडी – १७ एप्रिल, ४३ मतदारसंघ माल्दा, मुर्शिदाबाद, कोलकाता, दक्षिण दिनाजपूर – २२ एप्रिल, ३५ मतदारसंघ माल्डा, मुर्शिदाबाद, विरभूम, कोलकाता नॉर्थ – २६ एप्रिल, अखेरच्या टप्प्यातले मतदान २९ एप्रिल.

  • तामिळनाडू – एकच टप्पा – ६ एप्रिल, कन्याकुमारी लोकसभा पोटनिवडणूक – ६ एप्रिल
  • केरळ – एकच टप्पा – ६ एप्रिल, मल्लापूरम लोकसभा पोटनिवडणूक – ६ एप्रिल
  • पुद्दुचेरी – एकच टप्पा – ६ एप्रिल

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची आणि लसीकरणाची काळजी घेऊन मतदान पार पाडण्यात येईल. नेहमीपेक्षा अधिक, आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज या निवडणूकीत लागणार असून त्याची रचना राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली आहे.

W Bengal Tamil nadu Assam Kerala Puducherry Assembly Elections 2021 poll schedule in Marathi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*