राजपथावर विठूनामाचा गजर, प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथात वारकरी संतपरंपरेची झलक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रथमच विठूनामाचा गजर ऐकायला मिळणार असून हरिनामाचा झेंडा रोवला जाणार आहे. महाराष्ट्राच्या संतपरपरेची झलक तमाम भारतीयांना चित्ररथाच्या माध्यमातून याची डोळा पाहता येणार आहे. Vithunama on Rajpath, glimpse of Warkari saint tradition in Maharashtra’s Chitraratha on Republic Day

प्रजासत्ताक दिन दरवर्षी विविध कार्यक्रमांनी आणि चित्ररथ काढून साजरा होतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष महत्व असते. विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांचे दर्शन चित्ररथातून घडविले जाते. यंदा वारकरी संतपरंपरा हा विषय महाराष्ट्राच्या चित्ररथाचा आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची 8 फूट उंचीची आकर्षणाचे केंद्र आहे.याशिवाय भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग, पांडुरंगाची 8.5 फुटी देखणी मूर्ती आहे. संतवाणी हा 8 फुटी ग्रंथ असून रथाच्या दुतर्फा संतांची वाचणे लिहिली आहेत. तसेच संत जनाबाई, कान्होपात्रा, नामदेव, शेख महंमद, नरहरी, सावता, दामाजीपंत, गोरोबा, एकनाथ, सेना आणि चोखामेळा यांच्या मूर्ती उभारल्या आहेत.

चित्ररथाचे वैशिष्ट्य

हा चित्ररथ नागपूर, यवतमाळ येथील कलाकारांनी तयार केला आहे. रोशन इंगळे, तुषार प्रधान, अजित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली 30 कारागिरांनी हा रथ तयार केला आहे. यवतमाळच्या राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पितापुत्रांनी रथावरच्या 4 मूर्ती फिरत्या ठेवण्यात योगदान दिले आहे. टाकाऊ वस्तूंचा खुबीने वापर करून त्यांनी मूर्ती घडविल्या आहेत, हे रथाचे वैशिष्ट्य आहे.

Vithunama on Rajpath, glimpse of Warkari saint tradition in Maharashtra’s Chitraratha on Republic Day

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था