Vishwajit Kadam's mother-in-law To face ED's interrogation

विश्वजित कदम यांच्या सासू ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात

काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासू गौरी भोसले या ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गौरी भोसले यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. Vishwajit Kadam’s mother-in-law To face ED’s interrogation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासू गौरी भोसले या ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गौरी भोसले यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली.

परदेशात खरेदी केलेल्या मालमत्तेची विचारपूस करण्यासाठी गौरी भोसले यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. गौरी भोसले यांच्या अकाऊंटमधून परदेशात अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या अकाऊंटमधून काही पैसेही परदेशात पाठवण्यात आले होते. या प्रकरणी गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.गेल्यावर्षी 27 नोव्हेंबरला अविनाश भोसले यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आणखी माहिती शोधण्यासाठी मुंबई, पुण्यासह 23 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. काही दिवसांपूर्वी गौरी भोसले यांची मुलगी आणि विश्वजीत कदम यांची पत्नी स्वप्नाली कदम यांनाही याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पत्नी असलेल्या गौरी भोसले या काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सासू आहेत.

Vishwajit Kadam’s mother-in-law To face ED’s interrogation

Vishwajit Kadam's mother-in-law To face ED's interrogation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*