Virat Kohli on Farmers Protest : विराटचे मार्मिक ट्विट ; मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट होऊ या

  • सचिन तेंडुलकर आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही अमेरिकन गायक रिहानाला खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. नसत्या उठाठेवी केल्याने रिहाना अन् ग्रेटा पडल्या तोंडघशी.Virat Kohli on Farmers Protest

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारता विरूद्ध आंतरराष्ट्रीय कटाच्या सुनियोजित प्रचार मोहिमेत सहभागी होत रिहाना आणि ग्रेटाने ट्विटर वर शेतकरी आंदोलनाला पाठींबा अशी पोस्ट केली. त्यानंतर त्यांना भारतीय सेलिब्रेटिजनी सडेतोड उत्तर दिले.आता स्टार क्रिकेटर विराट कोहलीने म्हटले आहे की यावेळी आपण एक होणे आवश्यक आहे.

मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट होऊ या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये शांततेने तोडगा निघेल जेणेकरून सर्व सुरळीत होईल आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतील. बुधवारी अमेरिकेन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस आणि काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या निषेधाला पाठिंबा दर्शविला.

 यावर भारत सरकारने कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांना ‘निहित स्वार्थी गट’ चा एक भाग म्हणून संबोधले आणि त्यांच्या समर्थनाचे वर्णन ‘सनसनाटी सोशल मीडिया हॅशटॅग आणि टिप्पण्या’ म्हणून केले. 

विदेशी सेलिब्रेटिजचा बॉलिवूड आणि त्यानंतर क्रिकेट खेळाडू ट्वीटद्वारे समाचार घेत आहेत. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. 

बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात परंतु सहभागी नसतात. भारतीय लोकांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. अखेर सचिनने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda चा हॅशटॅग वापरला.

Virat Kohli on Farmers Protest

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*