Violent Farmers Protest : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर फडकविला झेंडा; ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण ; आंदोलनाला पाठींबा देणारी नेतेमंडळी पडली तोंडघशी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल किल्ला परिसरात सोमवारी दुपारी शेतकरी पोचले. त्यांनी किल्ल्यावर झेंडा फडकवून दिल्ली सर केल्याचा आनंद व्यक्त केला. शेतकरी आंदोलन आता नेतृत्वहिन झाले असून कायद्याच्या विरोधात टाहो फोडणारी नेतेमंडळी मात्र, दिल्लीत शेतकरी घुसताच गायब झाल्याचे दिसत आहे. Violent Farmers Protest Flags installed by protestors continue to fly at Red Fort. 

गेली दोन महिने दिल्ली सीमेवर सिंघू, गाझियाबाद आणि टिहरी सीमेवर शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. चर्चेच्या 11 फेऱ्या होऊनही तिढा कायम राहिला. दोन वर्षे कायदा राबविणार नाही तसेच मागे घेणार नाही, अशी ठोस भूमिका केंद्राने घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढण्याचे जाहीर केले.त्यांना सरकारने प्रथम परवानगी नाकारून नंतर दिली. ठराविक मार्गांने दिल्लीत प्रवेशाची परवानगी आणि परेड काढण्यास सांगितले होते. परंतु शेतकऱ्यांनी शांततेत परेड काढण्याचे वाचन मोडले आणि हिंसक मार्ग निवडला आहे. लाठ्या, काठ्या आणि तलवारी यांचा मुक्त वापर आंदोलकांनी दिल्लीत घुसताना केला आहे.

आता ते लाल किल्ला परिसरात आले असून त्यांनी शीख धर्माचे प्रतीक असलेले झेंडा किल्ल्यावर फडकविला आहे.

Flags installed by protestors continue to fly at Red Fort.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था