विकास दुबेचा एन्काउंटर अखिलेश, प्रियांकांना “टोचला”


  • प्रियांका गांधींपाठोपाठ काँग्रेस नेत्यांनाही “शंकासूरांनी” पछाडले

वृत्तसंस्था

कानपूर : विकास दुबेच्या एन्काऊंटर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना “टोचला” आहे. या दोन्ही नेत्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

विकास दुबेचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी गहिरे संबंध होते. त्यात समाजवादी पक्ष, काँग्रेस, भाजप, बसप होते. पण एन्काउंटर भाजपच्या राज्यात झाला, ही बाब अखिलेश आणि प्रियांका सोयिस्कररित्या विसरले. प्रियांकापाठोपाठ इतर काँग्रेस नेत्यांनाही शंकांची उबळ येऊन त्यांनीही ट्विटर फैरी झाडल्या.

विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.

गुन्हेगाराचा अंत झाला, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सुरक्षा देणाऱ्या लोकांचं काय? असा सवाल करत विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर प्रियांका गांधींनी ट्वीट केले आहे. काल त्यांनी या प्रकरणी ट्वीट करत कानपूर हत्याकांडाप्रकरणाच्या तपासात यूपी सरकार फेल झालं असल्याची टीका केली होती. अलर्ट असतानाही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला ही घटना सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल तर आहेच मात्र आरोपीसोबत मिलीभगत आहे की काय? असे प्रियांका गांधींनी म्हटलं होतं.

सरकार पलटण्यापासून वाचवलं : अखिलेश सिंह

खरतंर ही कार पलटलेली नाही, रहस्य उलगडून सरकार पलटण्यापासून वाचवले गेले आहे, असे ट्वीट समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश सिंह यांनी केले.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे की, विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला. अनेक लोकांनी अशी शक्यता आधीच वर्तवली होती. मात्र अनेक प्रश्न आता मागे राहिलेत. सूरजेवाला म्हणाले की, जर त्याला पळूनच जायचं होतं तर त्यानं  उज्जैनमध्ये सरेंडर का केलं? त्या गुन्हेगाराजवळ अशी कोणती गुपितं होती जी सत्ता आणि सरकारशी संबंधांना उजेडात आणतील? मागील 10 दिवसातील कॉल डिटेल्स जारी का केल्या नाहीत? असा सवाल सूरजेवाला यांनी केलाय.

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे की, ज्याची शंका होती तेच घडलं. विकास दुबेचे कोणकोणत्या राजकीय लोकांशी, पोलिस आणि अन्य सरकारी लोकांशी संपर्क होता, हे आता समोर येणार नाही. मागील तीन चार दिवसात विकास दुबेच्या अन्य साथीदारांचाही एन्काऊंटर झाला होता. या तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एकसारखाच का आहे? असा सवाल दिग्विजय सिहांनी उपस्थित केलाय.  तसंच हे देखील माहिती करुन घेणं आवश्यक आहे की, विकास दुबेने मध्यप्रदेशचं उज्जैन महाकाल मंदिरचं सरेंडर होण्यासाठी का निवडलं? मध्यप्रदेशच्या कोणत्या प्रभावशाली व्यक्तिच्या भरवशावर तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काउंटरपासून वाचण्यासाठी आला होता? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती