निष्काळजी आणि हलगर्जीपणाचे बळी; भंडारा रूग्णालयातील दाहक वास्तव; ७ बालकांना वाचविल्याचे सांगण्यातच सरकारचा उच्चरव!!


भंडारा जिल्हा रुग्णालयात भल्या पहाटे घडलेल्या अग्निकांडाच्या घटनेतून प्रशासकीय निष्काळजी आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणाच समोर येत आहे. सिक न्यूबोर्न केअर युनिट (SNCU) मध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा बळी याच हलगर्जीपणातून गेल्याचे स्पष्ट होत आहे. ७ चिमुकल्यांना वाचवण्यात आल्याचे प्रशासन आणि ठाकरे – पवार सरकार आवर्जून सांगते आहे. Victims of negligence and carelessness; The inflammatory reality at Bhandara Hospital; Government’s statement saved 7 children


विशेष प्रतिनिधी

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयात भल्या पहाटे घडलेल्या अग्निकांडाच्या घटनेतून प्रशासकीय निष्काळजी आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणाच समोर येत आहे. सिक न्यूबोर्न केअर युनिट (SNCU) मध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा बळी याच हलगर्जीपणातून गेल्याचे स्पष्ट होत आहे. ७ चिमुकल्यांना वाचवण्यात आल्याचे प्रशासन आणि ठाकरे – पवार सरकार आवर्जून सांगते आहे. पण हलगर्जीपणावर पांघरूण घालण्याच्या प्रकाराखेरीज यात दुसरे काही नाही, हेही स्पष्ट होते आहे. कारण वेळेवर मदत मिळाली असती तर आणखी जीव वाचले असते, असे रूग्णालयातील नर्सेसचे म्हणणे आहे.जिल्हा शल्यचिकीत्सक प्रमोद खंडाते यांनी सांगितल्याप्रमाणे, “रात्री उशीरा 2 वाजेच्या सुमारास आग लागली. न्यूबॉर्न युनिटमधून आगीचा धूर निघत होता. नर्सने दार उघडले तेव्हा काही दिसणे कठीण होते. तिने वेळीच वरिष्ठांना याची माहिती दिली आणि कर्मचाऱ्यांनी मिळून नवजातांना बाहेर काढले. पण, तोपर्यंत 17 पैकी 10 चिमुकल्यांचा जीव गुदमरून गेला. तर 7 नवजातांना वाचवण्यात आले.” दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचे पुरावे
-ड्युटीवर असलेल्या नर्सने सांगितल्याप्रमाणे, रात्री 2 वाजता सिक न्यूबॉर्न केअर युनिटचे दार उघडले तेव्हा त्यामध्ये खूप धूर पसरला होता. त्या ठिकाणी एकही कर्मचारी नव्हता.

-मीडिया रिपोर्ट्सनुसार, इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलेल्या काही मुलांच्या काचा काळ्या पडल्या होत्या. अर्थातच आग लागून बराच वेळ झाला होता. याचा अर्थ तोपर्यंत स्टाफला काहीच पत्ता नव्हता.
-सिक न्युबॉर्न केअर युनिटमध्ये रात्री एक डॉक्टर आणि 4 ते 5 नर्स ड्युटीवर असतात. पण, घटनेच्या वेळी ते सगळे कुठे होते? ते जागेवर नसल्याचे सांगण्यात आले.
-आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगराणी ठेवण्याचा नियम आहे. ती ठेवण्यात आली नसल्याचा आरोप आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावरच बोट ठेवले आहे.
-काही नातेवाइकांनी आरोप केला की त्यांना गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्या बाळांना पाहण्याची परवानगी दिली नाही. नियमानुसार, दूध पाजण्यासाठी किमान आईला पाठवले जाऊ शकते. पण तसे घडले नव्हते, असे पालकांचे म्हणणे आहे.

Victims of negligence and carelessness; The inflammatory reality at Bhandara Hospital; Government’s statement saved 7 children

-इतक्या लहान बाळांची काळजी घेण्यासाठी असलेल्या वॉर्डमध्ये स्मोक डिटेक्टर का लावले नाहीत? असते तर कदाचित चिमुकल्यांचा जीव वाचवता आला असता, असेही सांगण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती