वरुण सरदेसाईचे ‘वाझेलेकी बारा..’; नितेश राणे यांची बोचरी टीका

आयपीएल बुकींकडून वसुली होत असल्याचा आरोप मी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता असे सांगत वरुणचे वाझेलेकी बारा असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता, असा सवालही त्यांनी केला आहे.  Varun Sardesai’s Waze Leki Bara, Allegations of Nitesh Rane


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आयपीएल बुकींकडून वसुली होत असल्याचा आरोप मी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता असे सांगत वरुणचे वाझेलेकी बारा असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता, असा सवालही त्यांनी केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असे त्यांनी म्हटले आहे. सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते नितेश राणेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाºया टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालतं. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती.

वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असे सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे एनआयएने वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण आणि सीडीआर तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली होती.

Varun Sardesai’s Waze Leki Bara, Allegations of Nitesh Rane

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*