वर्षा संजय राऊत पुन्हा एकदा हाजीर हो, ईडीने बजावले समन्स

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. त्यांना 11 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. या आधी 4 जानेवारी रोजी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पंजाब महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीच्या टीमने त्यांना 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या एक दिवस आधीच ईडीसमोर हजर झाल्या. Varsha Sanjay Raut Summoned Again By Enforcement Directorate


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. त्यांना 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी 4 जानेवारी रोजी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पंजाब महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीच्या टीमने त्यांना 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या एक दिवस आधीच ईडीसमोर हजर झाल्या.वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न विचारले गेले होते. त्या आपल्याबरोबर अनेक कागदपत्रे घेऊन ईडी कार्यालयात गेल्या होत्या. त्याआधी ईडीने वर्षा यांना 4 वेळा समन्स बजावला होता. मात्र त्या एकदाच हजर झाल्या. वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचा पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवले आहे.

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

Varsha Sanjay Raut Summoned Again By Enforcement Directorate

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*