ममतादीदी, पलानीस्वामींची अखेरच्या क्षणी मतदारांवर योजनांची बरसात, निवडणुका जाहीर होण्याआधी विविध घोषणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच तमिळनाडू आणि पश्चिीम बंगाल सरकारने विविध योजनांची घोषणा केली. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरी रोजगार योजनेअंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Various schemes declared by mamatadidi and palaniswami for voters

या वाढीचा फायदा राज्यातील ५६ हजार ५०० कामगारांना होणार असून त्यामध्ये ४० हजार ५०० कसल्याही प्रकारची कौशल्ये नसलेले कामगार आणि ८ हजार अर्धकुशल आणि आठ हजार कुशल कामगारांचा समावेश आहे.तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही विधिमंडळामध्ये बोलताना, शेतकरी आणि कामगारांना सोने तारण ठेवून देण्यात आलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याची अर्थव्यवस्था अद्याप कोरोनाच्या धक्क्यातून सावरलेली नाही त्यामुळे गरीब जनतेला यामुळे दिलासा मिळू शकेल असा विश्वाेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेने सोने तारण कर्जावरील व्याजाचे दर देखील कमी केले होते. याआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बारा हजार कोटी रुपयांची कर्ज माफी दिली होती.

Various schemes declared by mamatadidi and palaniswami for voters

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*