११० टक्के सुरक्षित कोरोना लसींनाच परवानगी; लसींमुळे नपुंसक होण्याचे दावे बकवास; ड्रग कंट्रोलर जनरल सोमाणींनी सुनावले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लसींवर गैरसमज पसरविणाऱ्यांवर भारताचे ड्रग कंट्रोलर जनरल व्ही. जी. सोमाणींनी आज बरसले. कोरोना लसीमुळे नपुंकत्व येते, हा दावा त्यांनी बकवास या शब्दांमध्ये फेटाळून लावला. Vaccines are 110 % safe. Some side effects like mild fever, pain & allergy are common for every vaccine. 

कोरोना प्रतिबंधक ११० टक्के सुरक्षित लसींनाच भारत सरकारने परवानगी दिली आहे. लसींविषयी कोणत्याही शंका उपस्थित करणे किंवा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावणे गैर आहे, असा स्पष्ट खुलासा व्ही. जी. सोमाणी यांनी केला आहे.सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींच्या तातडीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्या लसी पूर्ण सुरक्षित असल्याचा निर्वाळा सोमाणींनी दिलाय. एवढेच नाही तर ज्या लसींच्या सुरक्षेबाबत किंचितही शंका असेल, तर भारत सरकार त्याला परवानगीच देणार नाही आणि दिलेलीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

किंचित ताप येणे, थोडेसे दुखणे, किरकोळ अँलर्जी या तक्रारी कोणत्याही लसीबद्दल असतात, त्या कोरोना लसीबद्दलही राहतील. पण त्यातून कोणताही धोका नाही. त्या लसी सुरक्षित आहेत, असा निर्वाळा सोमाणींनी दिला.

Vaccines are 110 % safe. Some side effects like mild fever, pain & allergy are common for every vaccine.

लसींवर राजकीय टिपण्या केल्या जाताहेत, त्यावर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, त्यांनी लसींच्या सुरक्षेची खात्री देतच त्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांना सुनावले. कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते. लोकसंख्या नियंत्रणासाठी ही लस दिली जाणार आहे, अशी खुळचट विधाने समाजवादी पार्टीचे आमदार आशूतोष सिन्हा यांनी केले होते. त्याला बकवास या शब्दांत सोमाणींनी प्रत्युत्तर दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*