लसनिर्मितीत भारताची घौडदोड, दोन कंपन्यांच्या लसी मानवी चाचणीच्या टप्यात


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी लस बनविण्याच्या आवाहनानंतर देशातील अनेक औषधनिर्माण कंपन्या लसनिर्मितीसाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. भारतातील दोन कंपन्या लसीच्या मानवी चाचणीच्या टप्यात आहेत.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील अनेक औषधनिर्माण कंपन्या लसनिर्मितीसाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. भारतातील दोन कंपन्या लसीच्या मानवी चाचणीच्या टप्यात आहेत.

झायडस कॅडिला या कंपनीने बनविलेल्या झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था भारत बायोटेक या कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या को-व्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी याआधीच सुरू करण्यात आली आहे.

झायडस कॅडिला या कंपनीने सांगितले की, झायकोव्ह-डी लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला विविध ठिकाणी सुरूवात झाली आहे. झायडस कॅडिला कंपनीने बनविलेली लस ही माणसांवर उपचारांसाठी किती उपयोगी व सुरक्षित आहे याची पडताळणी करण्याकरिता मानवी चाचणी दोन टप्प्यांत करण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याला प्रत्येकी ८४ दिवस लागण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या लसीची एक मानवी चाचणी अहमदाबादमध्येही होणार आहे.

झायडस कॅडिला कंपनीच्या अहमदाबादमधील लसनिर्मिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये झायकोव्ह-डी या लसीच्या प्राण्यांवर केलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. त्यानंतर या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास केंद्रीय औषध नियंत्रकांकडून परवानगी देण्यात आली. या कंपनीने म्हटले आहे की, उंदीर, ससे आदी प्राण्यांतील प्रतिकार शक्तीत झायकोव्ह-डी लसीमुळे वाढ झाल्याचे दिसून आले.

भारत बायोटेक व आयसीएमआर बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या याआधीच सुरू झाल्या असून, अशा चाचण्यांपर्यंत पोहोचलेली ती पहिली भारतीय लस आहे. त्यानंतर झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा क्रमांक लागतो. जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. स्वदेशात कोरोनावर प्रतिबंधक लस बनविण्यात यश आले तर सर्वांना परवडेल अशा किमतीत ही लस सर्वांना देणे शक्य होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती