मोठा दिलासा; कोरोना लसीकरणास १६ जानेवारीपासून प्रारंभ; केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा; कोविड योध्द्यांना लसीकरणात सर्वोच्च प्राधान्य


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणास देशभरात १६ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात येणार असून केंद्र सरकारने आज ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लसीकरणाला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील डॉक्टर, नर्सेस, यांच्यासह सुमारे ३ कोटी कोविड योध्द्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. कोरोना युध्दात त्यांनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीला मोदी सरकारने प्रणाम केला आहे. Vaccination drive to kick off on 16th Jan, 2021

कोरोनाचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग लसीकरण हा आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत कोटयवधी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउन हा या आजाराचा फैलाव रोखण्याचा एक मार्ग होता. भारतात या लॉकडाउनमुळे आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे.जीवितहानी बरोबर आर्थिक हानी देखील मोठी झाली आहे. कोटयवधी लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष लसीकरणाकडे लागले होते. आता सुरक्षित लसी उपलब्ध झाल्यानंतर सरकारने लसीकरणाची महत्त्वाची घोषणा केली आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादित वापर करण्यास मान्यता दिली आहेच. त्यानुसार देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

Vaccination drive to kick off on 16th Jan, 2021

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणायी योजना आहे. त्यानंतर प्राधान्यक्रमाने ५० वर्षाँवरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील, असे सरकारी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था