उत्तर प्रदेश बनलेय देशाच्या विकासाचे इंजिन, रिपोर्ट कार्ड सादर करीत योगी सरकारचा चौकार


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने रिपोर्ट कार्ड सादर करीत चार वर्षाच्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. चार वर्षाच्या काळात राज्यात एकही दंगल झाली नसल्याचे सांगत चार वर्षात उत्तर प्रदेश देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून समोर आले असल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. uttarpradesh Yogi adityanath Government completes four years

योगी म्हणाले, सत्तेत आल्यानंतर राज्यातील अनेक गावात शाळा, रस्ते आणि विकासाचे नामोनिशाण नव्हते. एवढेच नाही तर काही आदिवासी क्षेत्रात तर मतदानाचा अधिकारही नव्हता. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर ते अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली गेली.


योगी सरकार गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ, चार वर्षांत एन्काऊंटरमध्ये १३५ गुन्हेगारांचा खात्मा, ९३३ कोटी रुपयांची अवैध संपत्ती जप्त


चकमकीबाबत विरोधकांकडून प्रश्नि उपस्थित केले जात असताना त्यावर योगी म्हणाले, की गुन्हेगाराचा कोणताही धर्म नसतो. कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याने राज्यात दरोडा, बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात घट झाली आहे. उत्तर प्रदेश ‘बिमारु राज्या’तून बाहेर पडले आहे. इज ऑफ डुइंग च्या यादीत यूपी दुसऱ्या स्थानावर आहे.

uttarpradesh Yogi adityanath Government completes four years

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती