Uttarakhand Joshimath Dam News LIVE : उत्तराखंड मध्ये पुन्हा हाहाकार ; जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धरण फुटले;गांवच्या गांव वाहून गेले; मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी


विशेष प्रतिनिधी

जोशीमठ : उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली.Uttarakhand Joshimath Dam News

जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात येणार अलकानंदजवळील भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. अलकनंदाच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामं करण्यात येईल. घटनास्थळी एसडीआरएफ सतर्क असून मी घटनास्थळी जात असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांची माहिती…

 

गांव वाहून गेले

मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार

आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Uttarakhand Joshimath Dam News

ITBP चे जवानांकडून बचाव कार्याला सुरुवात
बचाव मोहिमेसाठी ITBP च्या 200 जवानांची टीम तैनात करण्यात आली असून भारतीय सैन्याचे 4-5 जवान स्टँडबायवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी, आवश्यक असल्यास त्यांना मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले जाऊ शकतं

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती