उत्तर प्रदेशातील बलात्कारप्रकरणी पुजाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

सत्यनारायण, असे त्याचे नाव आहे. तो प्रमुख आरोपी आहे. त्याने अन्य दोघांच्या मदतीने उगाहाती परिसरातील मंदिरात 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता.


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्यामध्ये 50 वर्षीय महिलेवर मंदिरात सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पुजाऱ्याला पोलिसांनी अटक केली. अन्य दोघांना कालच अटक झाली आहे. Uttar Pradesh rape case One arrest

सत्यनारायण, असे त्याचे नाव आहे. तो प्रमुख आरोपी आहे. त्याने अन्य दोघांच्या मदतीने उगाहाती परिसरातील मंदिरात 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. या घटनेनंतर तो पसार झाला होता. उगाहाती परिसरात एका घरात तो लपून बसला होता. पोलिसांनी छाप टाकून त्याला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार प्रशांत यांनी दिली. अटक करून चौकशी सुरु केली आहे.रविवारी 50 वर्षीय अंगणवाडी सेविका मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती. तेथे सत्यनारायण आणि दोघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर प्रेत घरासमोर आणून टाकले होते.

Uttar Pradesh rape case One arrest

शवविच्छेदनअहवालात बलात्कार केल्याचा आणि तिच्या खाजगी भागात जखम आणि पायात फ्रॅक्चर झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येसंदर्भात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.दोन आरोपींना अटक केली होती. पसार झालेल्या सत्यनारायणला पकडून देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*