ॲस्ट्राझेनेकाची लस ७९ टक्के प्रभावी, तरीही अमेरिका देईना अद्याप मान्यता

विशेष प्रतिनिधी

लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका कंपनी यांनी संयुक्तपणे विकसीत केलेली लस ७९ टक्के प्रभावी ठरत असल्याचे अमेरिकेत झालेल्या एका चाचणीतून दिसून आले आहे. या लशीला जगभरातील ५० हून अधिक देशांनी मान्यता दिली असली तरी अमेरिकेने मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही.USA still not approved AstraZeneca vaccine

अमेरिकेने लशीला परवानगी दिल्यास युरोपमध्ये या लशीबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. ही लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याच्या तक्रारींनंतर युरोपमध्ये काही देशांनी या लशीचा वापर थांबविला आहे. शंका दूर झाल्याने जर्मनीने पुन्हा लसीकरणाला सुरुवात केली असली तरी अद्यापही काही देश साशंक आहेत.ॲस्ट्राझेनेका लशीच्या अमेरिकेत झालेल्या चाचणी प्रक्रियेत ३० हजार स्वयंसेवकांनी सहभाग गेतला होता. यापैकी २० हजार जणांना लस दिली गेली, तर उर्वरित १० हजार जणांना निर्धोक असलेली बनावट लस देण्यात आली. या चाचणीचे निकाल जाहीर झाले असून त्यानुसार, कोरोनाच्या लक्षणांविरोधात ही लस ७९ टक्के प्रभावी असून संसर्गाची स्थिती गंभीर होण्यापासून लशीमुळे पूर्ण संरक्षण मिळते.

सर्व वयोगटांमधील नागरिकांमध्ये ही लस प्रभावी ठरत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. या अहवालावर अमेरिकेत विविध पातळ्यांवर चर्चा होऊन त्यानंतरच लशीला परवानगी देण्याबाबत विचार होणार आहे.

USA still not approved AstraZeneca vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*