जागतिक महासत्ता चीन व अमेरिका एकमेकांना थेट भिडल्या, नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आरोप प्रत्यारोप

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अमेरिकेत ज्यो बायडेन सत्तेवर आल्यानंतर अमेरिका आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज झालेल्या पहिल्याच थेट भेटीत अमेरिकेने चीनला कडक शब्दांत सुनावले. तुमच्याच आक्रमक कृत्यांमुळे जागतिक स्थैर्याला धोका निर्माण झाला असल्याचे अमेरिकेने सांगताच चीननेही तातडीने प्रत्युत्तर दिले. या घटनेमुळे आगामी काळातही या दोन महासत्तांत तणाव कायम राहण्याची चिन्हे बळावली आहेत USA – China forging ministers talk failed

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे संचालक यांग जेईची आणि परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याबरोबरच अमेरिकचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हे या बैठकीत सहभागी झाले होते.दोन देशांमध्ये सध्या असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ‘जगात नियमांवर आधारित व्यवस्था असावी, यासाठी अमेरिका आग्रही आहे. या व्यवस्थेमुळे देशांना आपापसांतील वाद किंवा मतभेद शांततेच्या मार्गाने सोडविण्याची संधी मिळते आणि जागतिक व्यापारात समान संधी उपलब्ध होते.

चीनमुळे या व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे,’ असे ब्लिंकन यांनी सांगितले. हे सांगताना ब्लिंकन यांनी हाँगकाँग, तैवान येथील राजकीय हस्तक्षेप, सायबर हल्ले, शिनजिआंगमधील अल्पसंख्यांकावरील अत्याचार अशी उदाहरणे दिली.

चीननेही ब्लिंकन या ‘नियमाधिरित व्यवस्थे’च्या मुद्द्याचा प्रतिवाद केला. आम्ही संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतो, केवळ काही निवडक देशांनी ठरविलेल्या व्यवस्थेचे पालन करण्यास चीन बांधिल नाही, असे यांग जेईची यांनी सुनावले.

USA – China forging ministers talk failed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*