अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये नेहा गुप्ता, रीमा शाह यांची नियुक्ती; राष्ट्रपती बायडेन यांची भारताशी संबंध दृढ करण्याच्या दिशेने पावले


विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नूतन राष्ट्रपती जो बायडेन यांनी नूतन प्रशासनात भारतीय वंशाच्या व्यक्तींना विशेषतः महिलांना स्थान देऊन भारताशी संबंध दृढ करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. US President-elect Joe Biden announces additional members of Office of White House Counsel, including Indian-Americans Neha Gupta and Reema Shah.

भारतीय अमेरिकन नेहा गुप्ता आणि रीमा शाह यांच्यासमवेत व्हाईट हाऊसच्या कार्यालयाच्या अतिरिक्त सदस्यांची घोषणा बायडेन यांनी मंगळवारी केली. प्रशासनाची घडी बसविण्यासाठी भारतीय बुद्धीमतेचा वापर करून घेण्याची त्यांची योजना दिसते, हे या निवडीवरून स्पष्ट होते.

मुरब्बी राजकारणी असल्याने सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हैरिस यांना त्यांनी चक्क उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार बनविले होते. त्याचा अमेरिकन भारतीय मते खेचण्याचा मोठा फायदा झाला होता.

US President-elect Joe Biden announces additional members of Office of White House Counsel, including Indian-Americans Neha Gupta and Reema Shah.

आता व्हाईट हाऊसच्या कार्यालयात चक्क नेहा गुप्ता आणि रीमा शाह यांची नियुक्ती करून महिलांना बायडेन प्रशासनात सन्मान दिला जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या नियुक्तीनंतर आणि सत्तांतरानंतरही भारताचे अमेरिकेबरोबरच संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती