अमेरिकेच्या संसदेत पाकिस्तानचा विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचे विधेयक दाखल

अमेरिकेतील रिपब्लिकन खासदार अ‍ॅन्डी बिग्स यांनी सादर केलेल्या विधेयकात पाकिस्तानच्या मुख्य नॉन-नाटो सहयोगी पदाचा दर्जा संपुष्टात आणण्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. या दर्जामुळे पाकिस्तानला अनेक फायदे मिळतात. US passes bill to end Pakistan special status


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेच्या 117व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एका खासदाराने पाकिस्तानचा ‘अमेरिकेचा मुख्य नॉन-नाटो सहयोगी दर्जा’ संपुष्टात आणण्यासाठी प्रतिनिधी सभागृहात एक विधेयक मांडले. रिपब्लिकन खासदार अ‍ॅन्डी बिग्स यांनी सादर केलेल्या विधेयकात पाकिस्तानच्या मुख्य नॉन-नाटो सहयोगी पदाचा दर्जा संपुष्टात आणण्याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

या दर्जामुळे पाकिस्तानला अनेक फायदे मिळतात. उदा. अमेरिकेच्या जास्तीत जास्त संरक्षण साधनांपर्यंत पोहोच, सहयोगी संरक्षण संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये सहभाग, असे विविध फायदे मिळतात.या विधेयकात असेही म्हटले आहे की, पाकिस्तानला मुख्य गैर नाटो सहयोगीचा दर्जा तोपर्यंत मिळणार नाही, जोपर्यंत पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या कारवायांना आळा घालणार नाही. याशिवाय त्यांना हक्कानी नेटवर्कची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी लष्करी मोहीम चालवल्याचे सिद्धही करावे लागेल. तसेच पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांविरुद्ध खटला चालवण्यासाठी आणि अटक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे प्रमाणित करावे लागेल.

US passes bill to end Pakistan special status

2004 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात पाकिस्तानला प्रमुख नॉन-नाटो सहयोगी म्हणून दर्जा देण्यात आला होता. सध्या 17 देश हे अमेरिकेचे प्रमुख नॉन-नाटो सहयोगी देश आहेत. जानेवारी 2018 मध्ये अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलेली सर्व आर्थिक आणि सुरक्षा मदत थांबविली. त्यांच्या प्रशासनानेही पाकिस्तानच्या प्रमुख नॉन-नाटो सहयोगी दर्जा संपुष्टात आणण्याचा विचार केला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार दर्जा दिला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*