ट्रम्प समर्थकांच्या धुडगुसानंतर अमेरिकन काँग्रेसच्या कामकाजाला सुरवात; दशकभरानंतर काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटचे वर्चस्व येणार; बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तबाची तयारी

अमेरिकन कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक संघर्षानतर अमेरिकन काँग्रेसचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तेथे राज्यवार इलेक्ट्रोल वोट्स मोजून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्याच बरोबर अमेरिकन काँग्रेसमध्ये १० वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचेही वर्चस्व निर्माण होत कारण त्यांनी ५० टक्के जागा जिंकल्या आहेत. US Congress Work Started after Donald Trump Supporters Riot; Congress will dominated by Democrats After decade Preparations to Declare Biden’s victory


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकन कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक संघर्षानतर अमेरिकन काँग्रेसचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तेथे राज्यवार इलेक्ट्रोल वोट्स मोजून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्याच बरोबर अमेरिकन काँग्रेसमध्ये १० वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचेही वर्चस्व निर्माण होत कारण त्यांनी ५० टक्के जागा जिंकल्या आहेत. हा विजय डेमोक्रॅटचे बायडेन प्रशासनाबरोबरच अमेरिकन काँग्रेसमध्येही वर्चस्व निर्माण करेल.ट्रम्प समर्थकांनी कॉपिटॉल हिलवर अभूतपूर्व धुडगूस घातल्यानंतर त्याचा जगभरातील लोकशाही राष्ट्रांमधून निषेध होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्या देशातील सत्तांतर शांततेच पार पडले पाहिजे. हिंसक जमावाचा लोकशाही व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जगभरातील निषेधाची दखल घेऊन ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ट्रम्प यांची सगळी सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आली होती. फेसबुकवरचा त्यांचा चिथावणीखोर वक्तव्य करणारा विडिओ हटविण्यात आला होता.

US Congress Work Started after Donald Trump Supporters Riot; Congress will dominated by Democrats After decade Preparations to Declare Biden’s victory

खुद्द रिपब्लिकन पक्षातील ट्रम्प समर्थक नेतेही त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे राहिले आहेत. उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स हे त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत. ते अमेरिकन काँग्रेसच्या सिनेटचे सभापती आहेत. त्यांनी शांततेत सत्तांतराची प्रक्रिया सुरू केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*