अमेरिकेची तारांबळ; एकीकडे भारतावर निर्बंध लादण्याची धमकी, दुसरीकडे संरक्षण उत्पादनात मेक इन इंडियासाठी मनधरणी

भारताने हवाई संरक्षण प्रणाली एस ४०० रशियाकडून खरेदीचा करार करताच खवळलेल्या अमेरिकेने भारतावर निर्बंध लादायची एकीकडे धमकी दिली खरी… पण अवघ्या काही दिवसांतच त्यांना भारताच्या दृढनिश्चयाची जाणीव होताच… भारताची मनधरणी करण्याची तारांबळही उडाली आहे. US Confused Between imposing Bans on India and Partnership In Make in India defense products


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने हवाई संरक्षण प्रणाली एस ४०० रशियाकडून खरेदीचा करार करताच खवळलेल्या अमेरिकेने भारतावर निर्बंध लादायची एकीकडे धमकी दिली खरी… पण अवघ्या काही दिवसांतच त्यांना भारताच्या दृढनिश्चयाची जाणीव होताच… भारताची मनधरणी करण्याची तारांबळही उडाली आहे.

त्याचे झाले असे, की भारताने रशियासमवेत हवाई संरक्षण प्रणाली एस ४०० खरेदीचा करार केला. त्यातून आपले संरक्षण सामग्री निर्यातीच्या हितसंबंधांना धक्का बसल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याला वाटले. त्यातून भारताला “गुंतवणूक मर्यादेची” धमकी देण्यात आली. पण भारत काही बधला नाही… उलट भारत रशियासह इस्त्रएलशी आणखी करार करण्याची शक्यता निर्माण झाली… त्यानंतर अमेरिकेचे भारतातील प्रतिनिधी सामंजस्याची भूमिका घेऊ लागल्याचे स्पष्ट झाले… एवढेच नाही, तर भारत संरक्षण सामग्री उत्पादनात मेक इंडियाला प्रोत्साहन देऊ इच्छितो, याची अमेरिकेला जाणीव झाली. अमेरिकन प्रतिनिधी केन जस्टर यांनीच याचा खुलासा केला. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील मेक इन इंडिया संकल्पनेला अमेरिका सहकार्य करू इच्छिते, असे वक्तव्य त्यांनी करून निर्बंध लादण्याची भाषा सौम्य करण्याचा प्रयत्न केला.


भारत-रशिया संरक्षण करारामुळे अमेरिकेचे पित्त खवळले! रिपोर्टमध्ये निर्बंधांचा इशारा


भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात सीमेपलिकडे जाऊन सहकार्य करू शकतात. गेल्या चार वर्षांत तसे प्रयत्न झाले आहेत. यापुढेही असे प्रयत्न चालू राहतील, असा निर्वाळा जस्टर यांनी दिला आहे.

रशियाशी झालेल्या करारावर थेट भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. उलट भारत अधिक तंत्रज्ञान सामायिकीकरण आणि सहनिर्मिती उपक्रमांबद्दल उत्सुक आहे, तर अमेरिका भारताच्या संरक्षण ऑफसेट धोरणात आणखी सुधारणा तसेच संरक्षण क्षेत्रात उच्च परकीय गुंतवणूक मर्यादेचे आवाहन करते, असे ते म्हणाले.

US Confused Between imposing Bans on India and Partnership In Make in India defense products

तत्पूर्वी रशियामध्ये बनवलेल्या एस-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताच्या कोट्यवधी डॉलर्सच्या व्यवहारामुळे अमेरिकेने ‘काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट’अंतर्गत भारतावर निर्बंध लादले जाऊ शकतात, असे म्हटले होते. पण जस्टर यांचे विधान नंतर आल्याने अमेरिकेची भूमिका अपरिहार्यतेने सौम्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*