अमेरिकेत आठ चिनी सॉफ्टवेअर अप्लिकेशन्सच्या व्यवहारावर बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 चिनी सॉफ्टवेअर अप्लिकेशन्सच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. त्यामध्ये अँटी ग्रुपच्या अलिपेचाही समावेश आहे. या संदर्भातील अध्यादेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे, असे वरिष्ठ प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले.US bans eight Chinese software applications

अमेरिका फर्स्ट , असा नारा देणारे ट्रम्प यांची राष्ट्रपती पदाची मुदत 20 जानेवारीला संपत असताना त्यांनी जाताजाता अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेतल्याचे झाले आहे.ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या चिनी कंपन्याच्या अमेरिकेतील व्यापारावर गदा येणार आहे. तसेच अमेरिकी कंपन्यांना या क्षेत्रात मोकळे रान मिळणार असल्याने ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

US bans eight Chinese software applications

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*