शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचे पावणे ३.७५ कोटींचे नवीन ऑफिस आणि कंगनाचे ट्विटर बाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता . आता उर्मिलाने नवीन पक्षासाठी नवीन ऑफिस खरेदी केले आहे. उर्मिलाचे नवीन कार्यालय लिंकिंग रोड खास वेस्ट परिसरात उभारण्यात आले आहे . Urmila matondkar purchased office after entering shiv sena

हे कार्यालय सहाव्या मजल्यावरुन असून, १ हजार स्वेअर फूट जागेत आहे. या इमारतीत कार्यालयाचे भाडेच महिना ५ ते ८ लाख रुपये आहे तर विकत घेतलेल्या या कार्यालयाची किमंत ३ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Urmila matondkar purchased office after entering shiv sena

कंगनाचे ट्विटर बाण : ‘उर्मिलाजी जर मी तुमच्याइतकी हुशार असते तर काँग्रेसला सपोर्ट केला असता ‘ भाजपला पाठिंबा देऊन माझा काही उपयोग

झाला नाही, पण कॉंग्रेसमुळे उर्मिलाला खूप फायदा झाला आहे. ‘उर्मिला जी मी स्वत:च्या मेहनतीने घरे बांधली होती, कॉंग्रेस त्यांना तोडत आहे. भाजपाला खुश करण्यामुळे माझ्यावर फक्त २०-२५ केस आहेत. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या इतकी हुशार असते आणि कॉंग्रेस सोबत आले असते. खरच मी मूर्ख आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*